‘या’ पद्धतीने सेवन केल्यास लसूण ठेवेल उच्च रक्तदाबावर नियंत्रण


उच्च रक्तदाब हा हृदयाशी संबंधित अनेक विकारांना निमंत्रण देऊ शकतो. वेळीच उपाय न झाल्यास उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे ही एक आवश्यक बाब आहे. अनेक पदार्थांना चव प्रदान करण्यासाठी लसणीचा वापर केला जातो. मात्र, पदार्थांना चटपटीतपणा मिळवून देणारी लसूण औषधी गुणधर्मांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाची आहे. नैसर्गिकरित्या उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता लसणीमध्ये आहे.लसणीत असलेल्या एलिसिन नामक एक रसायन असते. त्यामध्ये रक्तदाब आणि कोलेस्टोरेललाही नियंत्रणात ठेवण्याचे गुण आहेत. अर्थात लसणीची पाकळी खाऊन जादूची कांडी फिरवल्यासारखा रक्तदाब नियंत्रणात येत नाही. तिच्या सेवनाच्या काही पद्धती आहेत. ‘या’ सहा प्रकारे लसणीचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवता येण्यास मदत होऊ शकते.

१) सॅलड: आपल्या नियमित सेवनाच्या सॅलडमध्ये बारीक चिरलेल्या लसणीचा समावेश केल्यास त्याचा स्वादही वाढतो आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

२) सूप: कोणत्याही पालेभाजीचे अथवा टोमॅटो, बीट अशा फळभाज्यांचे सूप तयार करताना त्यामध्ये लसणीचा समावेश करा. मात्र, सूपमध्ये मिठाचे प्रमाण कमी असावे.

३) लसूण व पाणी: सकाळी उठल्यावर उपाशीपोटी लसूण जराशी ठेचून पाण्याबरोबर त्याचे सेवन केल्यास अनेक आरोग्यदायक फायदे मिळतात.

४) लसणाचा चहा: चहा करताना त्यामध्ये लसूण घालून उकळून घ्या. त्यामुळे चहाला एक वेगळा स्वाद मिळेल आणि आरोग्यासाठीही ते उत्तम ठरेल. अर्थात या चहामध्ये दूध नसावे.

५) परतलेली लसूण: कोणतीही भाजी, आमटी, सूप, रस्सा करताना त्यामध्ये लसूण चिरून परतून वापरली जाते. त्यामुळे पदार्थाची चव वाढते.

६) लसूण व मध: लसूण ठेचून तिचे मधाबरोबर सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. लसणीच्या तेलाचाही अनेक जखमा व स्नायूदुखीसाठी वापर केला जातो.

Loading RSS Feed
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही