सॅमसंगचे स्मार्टफोन रेंटवर घेता येणार

फोटो साभार डेक्कन हेराल्ड

ज्या स्मार्टफोन युजर्सना विविध मॉडेलचे फोन वापरायची हौस आहे त्यांना हे फोन विकत न घेता वापरण्याची संधी सॅमसंगने उपलब्ध करून दिली असून सॅमसंग गॅलेक्सी एस २० सिरीजचे फ्लॅगशिप फोन प्रथमच रेंटवर मिळू शकणार आहेत. सॅमसंगने ही सुविधा सध्या फक्त जर्मनी मध्ये सुरु केली असून एस २० सिरीजचे स्मार्टफोन युजर महिना, तीन महिने, सहा महिने अथवा वर्षभर रेंटवर घेऊ शकतील. जेवढे महिने अधिक तेवढे रेंट कमी पडणार आहे.

सॅमसंगने ही योजना ग्रोव्हरच्या सहकार्याने सुरु केली आहे. सॅमसंग मोबाईल रिपोर्टनुसार या सेवेचा लाभ अधिकृत सॅमसंग स्टोर मध्ये आवश्यक त्या एस २० सिरीज फोनची निवड करून घेता येईल. त्यासाठी रेंट काय भरावे लागेल याचाही खुलासा केला गेले आहे.

१२८ जीबीचा एस २० एफई साठी तीन महिन्याला ५९.९० युरो, सहा महिन्यांसाठी ४९.९०, बारा महिन्यांसाठी २९.९० युरो भरावे लागतील.

स्टँडर्ड गॅलेक्सी एस २० साठी हे दर ९९.९० पासून ४९.९० युरो पर्यंत आहेत. एस २० प्लस साठी १०९.९० ते ५४.९० युरो तर टॉप अल्ट्रा मॉडेलसाठी ११९.९० युरो महिना ते ६९.९० युरो वर्षासाठी मोजावे लागतील. अशी सेवा सॅमसंग अन्य देशात सुरु करणार का याची माहिती दिले गेलेली नाही.