शाहरुख खानने ५०० रेम्डेसीवीर इंजेक्शनची केली मदत

फोटो साभार नवभारत टाईम्स

करोना काळात रुग्ण उपचारात वापरल्या जात असलेल्या रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या ५०० बाटल्या बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याने दिल्लीतील आरोग्य केंद्राला मोफत पुरविल्या असल्याचे समजते. या मदतीबद्दल दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी ट्विटरवरून शाहरुख खान आणि मीर फौंडेशनचे आभार मानले आहेत. जैन लिहितात, आम्हाला जेव्हा या इंजेक्शन्सची सर्वाधिक गरज होती तेव्हा तुम्ही ती डोनेट केली आणि आम्हाला सपोर्ट दिला याबद्दल आभार.

शाहरुखने जैन यांच्या ट्वीट ला उत्तर देताना मीर फौंडेशनचे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. तो लिहितो सत्येंद्रजी, एकत्र येऊन काम केल्यानेच आपण या संकटातून बाहेर पडू शकणार आहोत. माझी टीम आणि मी वेळोवेळी भविष्यातही मदतीचा हात देऊ इच्छितो. आपली टीम जी सेवा देत आहे त्याबद्दल धन्यवाद. शाहरुखने या पूर्वी सुद्धा करोना रुग्णांसाठी मदतीचा हात दिला असून हेल्थकेअर वर्कर्स साठी पीपीई किट पुरविले आहेत. त्याने त्याचे ऑफिस क्वारंटाईन सेंटर म्हणूनही दिले होते.