‘गली बॉय’नंतर पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आलिया-रणवीर


आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने अभिनेता रणवीर सिंगने जिंकली असून तो आगामी दोन वर्षात सात नवे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे. रणवीर सिंग या चित्रपटांपैकी एका चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्टसोबत काम करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्या दोघांनी यापूर्वी ‘गली बॉय’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

यासंदर्भातील वृत्त मुंबई मिररने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार करण जोहर रणवीर आणि आलिया एकत्र काम असलेल्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तसेच आपल्या आगामी चित्रपटांचे चित्रीकरण संपवून रणवीर या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. या चित्रपटासाठी तो २५ दिवसांच्या वर्कशॉपमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

या चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल २०२१मध्ये सुरु होणार आहे. दरम्यान आलिया भट्ट देखील संजयलीला भंसाली यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे. अद्याप रणवीर आणि आलियाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Loading RSS Feed