गेल्या २० वर्षात हृदयरोगाने घेतलेत सर्वाधिक बळी

जागतिक आरोग्य संस्थेने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार २०२० मध्ये जगात सर्वधिक मृत्यू हृदयविकाराने झाले असून गेल्या २० वर्षात ही संख्या २० लाखांनी वाढून ९० लाखांवर गेली आहे. या अहवालात सर्वाधिक मृत्यू कशामुळे झालेत अश्या १० व्याधींची आकडेवारी दिली गेली आहे. विशेष म्हणजे यात टीबी पहिल्या दहात नाही. गेल्या वर्षी तो ७ क्रमांकावर होता. मलेरियामुळे होणारे मृत्यू प्रमाण सुद्धा घटले असल्याचे दिसून आले आहे.

सर्वाधिक जीव घेणाऱ्या दहा व्याधींमध्ये हृदयरोगानंतर दोन नंबरवर स्ट्रोक आहे. त्यापाठोपाठ क्रोनिक पल्मोनरी, लोअर रेस्पीरेटरी, नियोनेटल कंडीशन, ब्रोन्क्स लंग कॅन्सर, अल्झायमर डीमेंशीया, डायरिया, मधुमेह, आणि किडनी विकार याचा समावेश आहे. हृदय रोगापाठोपाठ सर्वाधिक मृत्यू विविध प्रकारच्या श्वसन रोगांमुळे झाले आहेत. मधुमेह मृत्यूचे प्रमाण ७० टक्के वाढले असून पुरुषांमध्ये हे प्रमाण ८० टक्क्यावर आहे तर डिमेशियामुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण ६५ टक्के आहे.

२००० सालापूर्वी एचआयव्ही या यादीत ८ व्या स्थानावर होता तो या नव्या यादीत १९ व्या स्थानी आहे. गेल्या वीस वर्षात माणसाचे सरासरी आयुष्यमान ६ वर्षांनी वाढले आहे. ते ६७ वरून ७३ वर गेल्याचे या अहवालात नमूद केले गेले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही