तामिळनाडू सीबीआय कस्टडीतून ४५ कोटींचे सोने गायब?

फोटो साभार न्यू इंडिअन एक्सप्रेस

तामिळनाडू सीबीआयच्या चेन्नई येथील सेफ कस्टडीतून ४५ कोटी रुपयांचे १०३ किलो सोने गायब झाले असल्याचे वृत्त आहे. मद्रास हायकोर्टाने तमिळनाडू सीबीआय सीआयडी ना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश जारी केले आहेत. हा तपास सहा महिन्यात पूर्ण करण्यास न्यायालयाने बजावले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २०१२ मध्ये चेन्नई येथील सुराणा कार्पोरेशन लिमिटेडच्या कार्यालयातून छापा मारून सीबीआयने सोन्याच्या विटा आणि दागिने असे ४००.५ किलो सोने जप्त केले होते. हे सर्व सोने सीबीआयच्या लॉकर मध्ये सेफ ठेवले गेले होते. गायब झालेले सोने याच सोन्याचा भाग आहे असे समजते.

सीबीआयतर्फे या संदर्भात असा खुलासा केला गेला आहे की जेव्हा सोने जप्त केले गेले तेव्हा त्याचे एकत्र वजन केले गेले होते. पण स्टेट बँक आणि सुराणा याच्यातील कर्ज प्रकरणात नियुक्त केलेल्या लिक्वीडेटरकडे सोने सोपविताना त्याचे वजन वेगळे वेगळे केले गेले. सीबीआय सेफव्हॉल्टच्या ७२ किल्ल्या चेन्नईच्या प्रिन्सिपल स्पेशल कोर्टात दाखल केल्या गेल्या आहेत. त्यामुळे सोन्याच्या वजनात दिसत असलेला फरक वेगवेगळे वजन केल्याने दिसत आहे. पण सीबीआयचे हे म्हणणे कोर्टाने मान्य केलेले नाही.