टाईम्स मासिकाच्या कव्हरपेज वर रेड क्रॉस

फोटो साभार रेडक्रॉस प्लेज

टाईम या प्रतिष्ठित मासिकाच्या कव्हर पेजवर २०२० रेड क्रॉस छापला गेला असून त्या खाली वर्स्ट इयर म्हणजे सर्वात खराब वर्ष असे छापले गेले आहे. ९३ वर्षाच्या कारकीर्दीत या मासिकाच्या कव्हर पेज वर रेड क्रॉस छापला जाण्याची ही पाचवी वेळ आहे. अन्यथा कव्हरपेज वर खास व्यक्तींचे फोटो छापले जातात.

यंदा या मासिकाने अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांची पर्सन ऑफ द इअर म्हणून निवड केल्याने त्या दोघांना कव्हर पेज वर जागा दिली गेली आहे.

यापूर्वी या मासिकाच्या इतिहासात १९७५ मध्ये जर्मनीचा हुकुमशहा हिटलर याच्या मृत्यू चित्रांकनात रेडक्रॉस छापला गेला होता. त्यानंतर इराक युध्द सुरु झाल्यावर असा रेड क्रॉस छापला गेला होता. २००६ मध्ये अमेरिकन सेनेने इराकमध्ये अल कायदाचा दहशतवादी अबू मौसम अल जरकावी यांचा खात्मा केल्यावर तिसऱ्यावेळी रेड क्रॉस छापला गेला होता तर २०११ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर मोहिमेचा मास्टर माईंड ओसामा बिन लादेन याला ठार केल्यावर चौथ्यावेळी रेड क्रॉस छापला गेला होता.