ऑस्ट्रेलियात करोना लस फेल, एचआयव्ही संक्रमण लक्षणे दिसली
ब्रिटनने जगात सर्वप्रथम कोविड १९ लसीकरणाची सुरवात केली आहे मात्र ऑस्ट्रेलियात क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी आणि बायोटेक फर्म सीएसएल यांनी मिळून विकसित केलेली कोविड लस फेल गेली आहे. या लसीच्या क्लिनिकल ट्रायल मध्ये लस दिल्या गेलेल्या स्वयंसेवकांमध्ये एचआयव्ही एड्सची लक्षणे दिसल्याने लसीच्या ट्रायल थांबविल्या गेल्या आहेत.
गेले संपूर्ण वर्ष कोविड १९ ने जगावर जणू ताबा मिळविला असून कोविड संक्रमितांची संख्या ६.९ कोटींवर गेली आहे आणि मृतांचा आकडा ११ लाखांवर गेले आहे. या परिस्थितीत अनेक देश कोविड १९ प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारने कोविड १९ च्या चार प्रकारच्या लस खरेदीचा निर्णय घेतला होता त्यात वरील लसीचा समावेश आहे. या लसीच्या ५१ दशलक्ष डोस साठी सरकारने कंपनीला ऑर्डर दिली होती, पण आता ती रद्द केली गेल्याचे समजते.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन म्हणाले ट्रायल सुरु असताना ज्यांना लस दिली गेली त्यांच्यात एचआयव्ही संक्रमण लक्षणे दिसली. लस देण्यापूर्वी त्यांच्या रक्तचाचण्या केल्या गेल्या होत्या तेव्हा एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह होती. पण लस दिल्यावर त्यांच्यात एचआयव्ही अँटीबॉडी दिसल्याने ताबडतोब चाचण्या थांबविल्या गेल्या आहेत. सरकार कोविड १९ लसीबाबत अतिशय सावध आणि जागरूक आहे त्यामुळे हा निर्णय घेतला गेला. ऑस्ट्रेलियात २८०१२ कोविड १९ संक्रमित आढळले असून ९०८ मृत्यू झाले आहेत.