सोनिया गांधी यांच्याकडेच संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व


नवी दिल्ली: संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडेच राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांची जागा घेणार असल्याचे वृत्त ही अफवा असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. ही अफवा पसरवून विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

संपुआला प्रभावी नेतृत्व ही धुरा यांच्याकडे दिली जाणार असल्याचे वृत्त काही खाजगी वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाले आहे. राजधानी दिल्लीला वेढा घालून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आक्रमक पवित्र्यात असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेले हे वृत्त बिनबुडाचे असल्याचा दावा दोन्ही कॉंग्रेसनी केला आहे.

हे वृत्त पूर्णपणे बिनबुडाचे असल्याचा खुलासा काँग्रेसचे सरचिटणीस तारीक अन्वर यांनी केला आहे. हे वृत्त म्हणजे विरोधकांमध्ये गैरसमज पसरवून गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा आणि विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनीही या वृत्ताचा इन्कार केला.

सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर पक्षातून बाहेर पडलेल्या पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि अखंड काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी चर्चा काही काळापासून सुरू आहे. गुरुवारी काही वृत्तवाहिन्यांनी पवार हे संपुआचे नेतृत्व करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. त्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे

Loading RSS Feed