यामुळे गुगल आणि अॅमेझॉनला ठोठावण्यात आला १६ कोटी डॉलर्सचा दंड


पॅरिस – गुगल आणि अॅमेझॉनला फ्रान्समधील डेटा प्रायव्हसीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेने तब्बल १६.३ कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला असून गुगलवर १०० दशलक्ष युरो (१२.१ कोटी डॉलर्स) आणि अॅमेझॉनला ३५ दशलक्ष युरोचा (४.२ कोटी डॉलर्स) दंड डेटा प्रायव्हसीसंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावण्यात आला आहे. ट्रॅकर अथवा कुकीजच्या बाबतीत दोन्ही कंपन्यांच्या फेन्च वेबसाईटने इंटरनेट युझर्सना मंजुरी मागितली नाही. जाहिरातींच्या उद्देशाने ते आपल्या आपण कंप्युटर्समध्ये सेव्ह झाल्या असल्याचे CNIL ने सांगितले.

आपल्या युझर्सना या कुकीजच्या उद्देशाबाद्दल गुगल आणि अॅमेझॉन कसे नाकारू शकतात. तसेच कोणतीही माहिती देण्यास याबद्दल ते असमर्थ ठरले आहेत. आपल्या वेबसाईट्समध्ये दोन्ही कंपन्यांनी सप्टेंबर महिन्यात बदल केले होते. पण फ्रान्सच्या नियमांप्रमाणे ते बदल योग्य नसल्याचे CNIL ने म्हटले आहे.

गुगलच्या प्रकरणात त्यांनी कुकीजद्वारे एकत्र केलेल्या डेटातून जाहिरातीद्वारे कमवलेल्या उत्पन्नातून नफा मिळवला. तब्बल ५० दशलक्ष युझर्सवरही याचा परिणाम झाला, असल्याचेही कंपनीने सांगितले. त्यांना ठोठावण्यात आलेला दंड हा त्यांच्या नियमांच्या उल्लंघनाच्या तुलनेत योग्य असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. गुगल आणि अॅमेझॉनला तीन महिन्यांचा कालावधी संबंधित संस्थेने दिला आहे. यामध्ये आपली पद्धत त्यांना बदलावी लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना यामध्ये ग्रांहकांना त्यांच्या डेटाचा वापर कसा केला जातो आणि कुकीजना ते कसे नाकारू शकतात, हे देखील त्यांना सांगावे लागणार आहे. असे कंपनीने न केल्यास त्यांना दररोज १ लाख युरोचा (१ लाख २१ हजार ०९५ डॉलर्स) दंड भरावा लागणार आहे.