शेतकऱ्यांसाठी काही तरी करा: धर्मेद्र यांचे सरकारला आवाहन


नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या आंदोलनांवर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांवरील संकटे वेदनादायक आहेत. सरकारने त्याबाबत काही कार्यवाही करावी, असे आवाहन धरमपाजींनी केले आहे.

नवे कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी राजधानीच्या वेशीवर देशभरातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. आंदोलनाचा हा १६ व दिवस आहे. सरकारने या आंदोलनाची डंख घेऊन कायदे रद्द ना केल्या दि. १४ पासून देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या संघटनांनी दिला आहे

शेतकरी बांधवांची परिस्थिती पाहून आपल्याला फार वेदना होत आहेत. ही परिस्थिती सुधारण्यातही सरकारने तातडीने काही उपाय करणे आवश्यक आहे, असे आवाहन धर्मेंद्र यांनी ट्विटरद्वारे केले आहे.