केरळमध्ये आढळला नव्या प्रकारच्या मलेरियाचा रुग्ण


तिरुवनंतपुरम: केरळमध्ये एका नव्या प्रकाराच्या मलेरियाचा रुग्ण आढळून आला आहे. अशा प्रकारचा मलेरिया झालेला भारतातील हा पहिलाच रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्री के के शैलजा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. मलेरियाच्या या प्रकाराला ‘प्लाझमोडियम ओव्हल’ संबोधले जाते.

हा रुग्ण एक जवान आहे. त्याने सुदानचा प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान त्याला मलेरियाची लागण झाली आहे त्याच्यावर कुन्नूर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

वेळेवर उपचार मिळाल्यास हा मलेरिया पूर्ण बारा होऊ शकतो आणि योग्य ती काळजी घेतल्यास त्याचा फैलाव टाळता येऊ शकतो, असे शैलजा यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना संसर्गाचा देशातील पहिला रुग्णही केरळमध्ये थ्रिसूर जिल्ह्यात आढळून आला होता. मूळचा केरळचा असणारा एक विद्यार्थी चीनमधील वुहान विद्यापीठात शिकत होता. तो भारतात असता त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.