चंदीगड: नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीला घेराव घालून बसलेल्या आंदोलकांना आणखी बाळ देण्यासाठी नवी कुमक राजधानीकडे रावण झाली आहे. पंजाबमधून तब्बल ५० हजार शेतकऱ्यांचा जथ्था ६ महिन्यांचे रेशन घेऊन दिल्लीकडे निघाले आहे.
सहा महिन्यांच्या रेशनसह ५० हजार शेतकरी दिल्लीकडे
आम्ही आमचे शीर तळहातावर घेऊन दिल्लीच्या दिशेने निघालो आहोत. आमचे प्राण कसे घ्यायचे हे मोदी सरकारने ठरवावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असे मजदूर संघर्ष कमिटीचे सतनामसिंग पन्नू यांनी सांगितले. फिरोजपूर, फाजिल्का, अबोहर, फरीदकोट या ठिकाणाहून हे शेतकरी दिल्लीकडे निघाले असल्याचे ते म्हणाले.
हजारो आंदोलक शेतकरी १६ दिवसांपासून दिल्लीला वेढा घालून बाळे सरकारने दिलेल्या सुधारणांचा फेटाळून लावला असून कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. दि. १४ पासून हे आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. पंजाब आणि हरयाणा येथून आणखी १० हजार आंदोलक सिंघू सीमेवर दाखल होत आहेत.