१९ अब्ज किंमतीत खरेदी करा सोन्याचा महाल
महागाई मुळे घरांच्या किमती उतरल्या असल्याचे सांगितले जात आहे पण या घराची किंमत मात्र अजूनही भरभक्कम आहे. कारण घराच्या किमती उतरल्या तरी सोन्याचे भाव चढेच आहेत आणि हे घर म्हणजे सोन्याचा अलिशान महाल आहे. हा महाल आता विक्रीसाठी उपलब्ध असून २ अब्ज युरो म्हणजे १९ अब्ज रुपयात तो खरेदी करता येणार आहे.
या विषयी अधिक माहिती अशी, रशियन उद्योगपती वलेरी कोगेन यांच्या मालकीचा हा अलिशान महाल इस्रायलच्या मेडिटेरीयन समुद्राजवळ आहे. वलेरी याची एकूण संपत्ती १ खरब ८२ अब्ज ९८ कोटी ६२ लाख आणि ५० हजार इतकी आहे. इतकेच नव्हे तर मास्को जवळचा दोमोदेडोव्ह विमानतळ त्याच्या मालकीचा आहे. इस्रायल जवळ असलेला त्याचा हा महाल किंमत आणि त्याचे रुपडे यामुळे जगभर चर्चेत आला आहे.
एका रिपोर्ट नुसार २०१४ मध्ये वेलरी रशियन श्रीमंत यादीत ४१ क्रमांकावर होता. त्याने विक्रीला काढलेल्या सोन्याचा महालात हॉल मध्ये मोठे झुंबर, सोन्याची नक्षी, किचनच्या चारी बाजूना सोन्याची नक्षी, घरात मोठा स्वीमिंग पूल, त्याच्यावर काचेचे छत, स्पा एरिया आहे. या महालात पाच मोठी बाथरूम असून त्यातही सोन्याने सजावट केली आहे.