अंबानीच्या घरी आला चिमुकला पाहुणा
फोटो साभार अमर उजाला
आशियातील श्रीमंत यादीत प्रथम क्रमांकवर असलेले रिलायंस उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी याना आजोबापदावर बढती मिळाली आहे. १० डिसेंबर रोजी त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. आकाश अंबानी यांची पत्नी आणि मुकेश यांची सून श्लोका हिने गुटगुटीत मुलाला जन्म दिला असून यामुळे अंबानी आणि मेहता परिवारात खुशीचे वातावरण आहे. आई आणि बाळ सुखरूप असल्याचे समजते.
गेल्या वर्षी ९ मार्च ला आकाश आणि श्लोका यांचा विवाह झाला होता. महागड्या विवाहात गणना झालेल्या या कार्यक्रमाला देश विदेशातून अनेक बडे पाहुणे उपस्थित होते. अंबानी यांच्या प्रवक्त्याने भगवान कृष्णाच्या कृपेने आकाश आणि श्लोका आईवडील बनले असे सांगितले. मुकेश आणि त्यांची पत्नी नीता यांचे हे पहिलेच नातवंड आहे.
या वर्षी करोनाच्या विळख्यात सापडल्याने जगातील तमाम कंपन्या नुकसानीत गेल्या असताना मुकेश यांचा रिलायंस ग्रुप मात्र फायद्यात आहे. त्यांच्या जिओ आणि रिलायंस रिटेल मध्ये अनेक परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षात मुकेश यांनी ६२० कोटी खर्चून ब्रिटन ची प्रसिध्द खेळणी निर्माती कंपनी हॅमलेज ग्लोबल लिमिटेड खरेदी केली होती.