दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा हे तपासावे लागेल – बच्चू कडू


मुंबई – शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा धक्कादायक दावा करत हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा रावसाहेब दानवेंचा डीएनए हे तपासावे लागेल असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.

शेतकऱ्यांचे सर्व देशभरात आंदोलन सुरु असून त्याला अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये चीन आणि पाकिस्तानचा शेतकरी आंदोलनामागे हात असल्याचे म्हणणे शेतकऱ्याचा अपमान आहे. रावसाहेब दानवेच नक्की हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी त्यांचा डीएनए तपासणे गरजेचे असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.