मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक दाखल झाले असून ईडी कार्यालयात चौकशीला प्रताप सरनाईक यांनी हजर राहावे यासाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार ईडी कार्यालयात ते हजर झाले असून चौकशीला सुरुवात झाली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर दिल्लीमधून आलेल्या ईडीच्या टीमने छापे टाकल्याने प्रकरण चांगलेच तापले होते.
चौकशीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या कार्यालयात दाखल
आमदार प्रताप सरनाईक यांना टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या कथीत आर्थिक गैरव्यवहारांबाबत तपास करणाऱ्या ईडीने समन्स जारी करून चौकशीस बोलावले होते. सरनाईक यांचे निवासस्थान, कार्यालयात ईडीने छापे घालून शोधाशोध केली होती. तसेच त्यांचे पुत्र विहंग यांना विभागीय कार्यालयात आणून चौकशीही केली होती.