भारत- चीन तणावामागे पाश्चात्य देशांचे कारस्थान: रशियाचा दावा


मॉस्को: भारत आणि चीनमध्ये झुंज लावून त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी पाश्चात्य देशांनी ‘इंडो पॅसिफिक रणनीती’चा वापर करीत आहेत, असा आरोप रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरॉव्ह केला आहे. भारत आणि रशिया यांच्यातील भागीदारी आणि जवळीक मोडून काढण्यासाठीही कुटीलपणे त्यांचे प्रयत्न सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली.

एकीकडे चीन आणि भारतामध्ये तणाव निर्माण करणे आणि दुसरीकडे भारत आणि रशियाच्या संबंधांमध्ये वितुष्ट निर्माण करणे असा पाश्चात्य देशांचा दुहेरी डाव आहे. त्यासाठी प्रामुख्याने अमेरिकेने भारतावर रशियाबरोबर असलेले सामरिक सहकार्य संपुष्टात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दबाव आणला आहे, असेही ते म्हणाले.

रशियनथिंक टॅंक असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवहार समितीच्या सर्वसाधारण सभेत लॅवरॉव्हयांनी हे वक्तव्य केले आहे..भारत आणि चीन यांच्यात वाढत असलेल्या तणावाचे निराकरण करण्यासाठी रशियाकडूनही प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.