इस्रायल कडून भारत खरेदी करणार स्मॅश हॉपरगन्स

फोटो साभार नवभारत टाईम्स

चीन आणि पाकिस्तान कडून असलेला धोका लक्षात घेऊन भारत, मित्रराष्ट्र इस्रायल कडून घातक रिमोट कंट्रोल्ड गन स्मॅश २००० खरेदी करत आहे. अँटी ड्रोन शस्त्र आणि संगणकीकृत फायर कंट्रोल व इलेक्ट्रोऑप्टिक साईट प्रणाली सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे हे हत्यार कोणत्याही रायफलवर सहज फिट करता येते. याच शस्त्राच्या मदतीने इराणचे अणुवैज्ञानिक आणि प्रमुख नेते डॉ. मोहसीन फाखरीजादेह यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे.

४ डिसेंबर रोजी साजऱ्या झालेल्या भारतीय नौदल सेना दिवस कार्यक्रमात अॅडमिरल करमबीरसिंग यांनी शत्रूचे ड्रोन हल्ले निपटण्यासाठी नौसेना स्मॅश २००० प्रकारच्या गन्स खरेदी करत असल्याचे सांगितले होते. या गन्स पुढच्या वर्षाच्या सुरवातीला मिळणार आहेत. या गन्सच्या सहाय्याने १२० मिटर उंचीवरून उडत असलेले ड्रोन सहज पाडता येते.

इस्रायलच्या स्मार्ट शुटर कंपनीने जुलाईमध्ये स्मॅश उत्पादनाशी संबंधित स्मॅश हॉपरगन विकसित केली होती. याच गनला लाईट रिमोट कंट्रोल वेपन स्टेशन (एलआरसीडब्ल्यूएस) म्हटले जाते. कोणत्याही ट्रायपोड वर, जमिनीवर, वाहनावर ती बसविता येते. ही गन स्वतःच लक्ष्य शोधून लॉक करते आणि मग दुरवर बसलेल्या ऑपरेटर ती फायर करू शकतो.