प्रताप सरनाईकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा


मुंबई – 10 डिसेंबरपूर्वी चौकशीसाठी ईडीच्या (ED) रडारवर असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना हजर राहायचे होते. याचदरम्यान ईडीकडून अटक होण्याची टांगती तलवार त्यांच्यावर होती. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना दिलासा दिला आहे. ईडीने 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छापेमारी केली होती. याप्रकरणी प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, कोणतीही कारवाई प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर करु नये. सरनाईक कुटुंबाला ईडी चौकशीसाठी बोलवू शकते. पण त्यांना अटक करु शकत नसल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान काल (8 डिसेंबर) सहकुटुंब मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात जाऊन प्रताप सरनाईक यांनी दर्शन घेतले होते. याचे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्याने सरनाईकांना सिद्धिविनायक गणपती पावला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.