लिव्हर हा मानवी शरीरातील महत्वपूर्ण अवयव आहे. लिव्हर तंदुरुस्त असेल तर आपण पोटाच्या सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर राहू शकतो. शरीरातून विषारी घटक बाहेर काढणे, रक्ताची शुद्धी करणे आणि एन्झाइम्सना सक्रीय करण्याचे अन्नाचे पचन व्यवस्थित करणे हे महत्वाचे काम लिव्हर करीत असते. जीवन आरोग्यपूर्ण करण्यासाठी लिव्हर सशक्त असणे अत्यंत आवश्यक आहे.
लिव्हरला सुरक्षित व कार्यक्षम ठेवण्यासाठी आहारात ठेवा ‘हे’ पदार्थ
तेलकट खाणे, अति धूम्रपान, मद्यपान, व्यायाम न करणे यामुळे लिव्हरच्या कामांवर टॅन निर्माण होतो. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास अटकाव होतो आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, काही साध्या पदार्थांचा आपल्या आहारात नियमित समावेश केल्यास लिव्हर सक्षम राहण्यास मदत होते.
ग्रीन टी
ग्रीन टीचे सेवन करणे लिव्हरची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे लिव्हर स्वच्छ करण्यासाठी ती उपयोगी पडतात. दिवसातून २ ते ३ कप ग्रीन टी घेणे उपयुक्त आहे.
बीट
बीटमध्ये प्लांट फ्लेवोनोइड्स आणि बीटा-कॅरोटीन असते. हे दोन्ही घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. बीटच्या नियमित सेवनाने लिव्हर आणि रक्त हे दोन्ही शुद्ध राहण्यास मदत मिळते.
गाजर
गाजरामध्ये ग्लूटाथियोन, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, सी, डी, ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक पौष्टिक घटक असतात. लिव्हरबरोबरच सामान्य आरोग्यासाठी गाजर खाणे फायदेशीर ठरू शकते.
कांदा
कोणत्याही पदार्थाची रुची वाढविण्यासाठी कांद्याचा वापर केला जातो. काही पदार्थ तर कांद्याशिवाय बनूच शकत नाही. मात्र, कांदा केवळ चव वाढविण्याचे काम करतो असे नाही तर आरोग्यासाठीही तो फायदेशीर आहे. कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गंधक असते. कांदयदा शरीराला शीतलता प्रदान करतो. कांद्यामध्ये जिवाणू आणि विषाणूंचा सामना करणारे प्रभावी घटक असतात. त्यामुळे लिव्हरला साफ ठेवण्याचे कार्य कांद्याच्या सेवनाने होते.
लसूण
लसणामध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी मायक्रोबॉयल आणि अँटी बायोटिक गुण असतात. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याच्या लिव्हरच्या कार्याला हे गुणधर्म मदत करतात.
लिंबू
लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याबरोबरच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.