आठशे वर्षानंतर आकाशात होणार ‘ख्रिसमस स्टार’चे दर्शन


मुंबई: तब्बल ८०० वर्षानंतर या वर्षी दि. २१ डिसेंबर रोजी सूर्यास्तानंतर ‘ख्रिसमस स्टार’चे दर्शन अवकाश निरीक्षकांना आणि सर्वसामान्यांनाही घडणार आहे. गुरू आणि शनी हे दोन ग्रह एका रेषेत आल्याने आकाशात एक दुहेरी चांदणी दिसणार आहे आणि निरभ्र असेल तर त्याला जगभरात कोठेही पाहता येणार आहे. या दुर्मिळ खगोलीय स्थितीमुळे आकाशात दिसणाऱ्या दुहेरी चांदणीला ‘ख्रिसमस स्टार किंवा ‘स्टार ऑफ बेथलेम असे म्हटले जाते.

उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या दिशेने सरकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, २१तारखेच्या रात्री ते एकमेकांसमोर येतील. त्यामुळे दोन्ही ग्रह एकाच मोठ्या ताऱ्यासारखे दिसतील. त्यांचा आकार पौर्णिमेच्या पूर्णाकृती चंद्राच्या १/५ असेल, अशी माहिती ह्युस्टनच्या राईस विद्यापीठातील भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राचे प्राध्यापक पॅट्रीक हार्टिगन यांनी सांगितले.

ही स्थिती या आधी ८०० वर्षांपूर्वी ४ मार्च १२२६ रोजी आकाशात पाहावयास मिळाली होती. या वर्षी ‘ख्रिसमस स्टार पाहण्याची संधी हुकली तर त्यासाठी १५ मार्च २०८० या दिवसापर्यंत वाट पाहावी लागेल, असेही प्रा. हार्टिगन यांनी सांगितले.