लहान मुलांवर मशिदी-मदरशांमध्ये दररोज इमाम बलात्कार करतात ; तस्लीमा नसरीन


नवी दिल्ली : आपल्या धर्माबाबत कायम वादग्रस्त वक्तव्य आणि बंडखोर लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका तस्लीमा नसरीन सध्या पुन्हा एकदा त्यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. तस्लीमा नसरीन यांनी बांगलादेशातील मशिदी-मदरशांमध्ये दररोज बलात्कार होत असल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशातील मशिदी-मदरशांवर तस्लीमा नसरीन यांनी ट्विटरवरुन ताशेरे ओढले आहेत.


आपल्या ट्विटमध्ये तसलीमा नसरीन यांनी लिहिले आहे की, इमाम आणि मदरशांमधील शिक्षक बांगलादेशातील मशिदी आणि मदरशांमध्ये मुलांवर दररोज बलात्कार करतात. अल्लाहाच्या नावावर ते रेप करतात. त्यांना माहिती आहे की, अल्लाह दयावान आहे. दिवसातून 5 वेळा नमाज त्यांनी पठण केला, तर अल्लाह त्यांच्या चूका, त्यांनी केलेले पाप माफ करेल.