निर्मला सीतारामन फोर्ब्स शक्तिशाली महिला यादीत

मंगळवारी फोर्ब्सने २०२० मधील पहिल्या १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली असून त्यात जर्मनीच्या चान्सलर अन्जेला मर्केल सलग दहाव्या वर्षी प्रथम क्रमांकावर राहिल्या आहेत तर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन याना या यादीत ४१ वे स्थान मिळाले आहे. अन्य भारतीय महिलांत रोशनी नाडर मल्होत्रा ५५, किरण शॉ मुझुमदार ६८ व्या तर लँडमार्क समूहाच्या अध्यक्ष रेणुका जनतियानी ९८ व्या क्रमांकावर आहेत.

फोर्ब्सची ही शक्तीशाली महिलांची १७ वी यादी आहे. ती तयार करताना ३० देशातील चार पिढ्यातील महिलांचा विचार केला गेला आहे. या यादीत दोन नंबरवर युरोपियन सेंट्रल बँक प्रमुख क्रीयोन लेगार्द असून त्या दुसऱ्यावेळी या यादीत समाविष्ट आहेत. अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरीस तीन नंबरवर आहेत तर बिल मिलिंडा गेट फौंडेशनच्या मेलिंडा पाचच्या स्थानी आहेत.

या १०० शक्तिशाली महिलांत १० राज्याच्या प्रमुख, ३८ कंपन्यांच्या सीईओ, पाच कलाकार सामील आहेत. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन ३२ व्या, तैवानच्या राष्ट्रपती साई वंग ३७ व्या तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना ३९ व्या स्थानावर आहेत. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ हिला ४६ वे स्थान मिळाले आहे.