स्टीव्ह जॉब्स कन्या ईव्हाचे हॉट फोटोशूट

अॅपल या नामवंत कंपनीचा संस्थापक स्टीव्ह जॉब्स आता या जगात नसला तरी अजूनही त्याची गणना प्रसिद्ध व्यावसायिक श्रेणीमध्ये केली जाते. सध्या मात्र याची मुलगी ईव्हा बरीच लाईमलाईट मध्ये आली असून २२ वर्षीय ईव्हाने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने नुकतेच ब्युटी कॅम्पेन साठी हॉट फोटोशूट केले असल्याने तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.

या फोटो मध्ये ईव्हा बाथटब मध्ये सौंदर्य प्रसाधनांसोबत दिसत आहे. ग्लोसीअर प्लेफुल हॉलीडे ब्युटी कॅम्पेन साठी हे फोटो शूट केले गेले आहे. यात ईव्हाने आकर्षक पोझेस दिल्या आहेत. ईव्हाचे पूर्वीपासून सोशल मिडियावर फॅन फॉलोअर्स असून इन्स्टाग्रामवर तिचे दीड लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. नवीन फोटो मुळे ईव्हा ग्लॅमर जगतात स्वतःचे स्थान नक्कीच निर्माण करू शकते असे मत व्यक्त केले जात आहे.

आजपर्यंत ईव्हा प्रसिद्धीपासून जाणून बुजून दूर राहिली आहे. स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल ती कुठेच बोलत नाही. घोडेस्वारीतील कौशल्यामुळे ती जगाच्या समोर आली होती. हॉर्स स्पोर्टच्या रिपोर्टनुसार २५ वयाच्या खालील जगातील ५ टॉप घोडेस्वारांत ईव्हाचा समावेश आहे. सध्या ती स्टँडफर्ड विद्यापिठात शिकत आहे आणि २०२१ मध्ये ती पदवी मिळवेल असे सांगितले जात आहे.