बायडेन यांनी लॉयड ऑस्टीन यांची संरक्षण मंत्री म्हणून केली निवड
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी अमेरिकी सेनेचे निवृत्त जनरल लॉयड ऑस्टिन यांची नवे संरक्षण मंत्री म्हणून निवड केली आहे. अर्थात कॉंग्रेसने मंजुरी दिल्यावर ही निवड नक्की होणार आहे. मात्र हे घडले तर ऑस्टिन अमेरिकेचे पाहिले अश्वेत संरक्षण मंत्री होतील ज्यांना पेंटागॉनची जबाबदारी पेलावी लागेल.
इराक मध्ये सैन्य कमांडर म्हणून कामगिरी बजावलेले ऑस्टिन अमेरिकेचे असे पहिले फोर स्टार जनरल असतील ज्यांनी युद्धाचे आव्हान पेलल्यावर संरक्षण मंत्री पदाचा भार स्वीकारला आहे. २०१६ मध्ये ऑस्टिन निवृत्त झाले असले तरी ६७ वर्षीय ऑस्टिन संरक्षण मंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे माजी सहकारी मायकल फ्लोरीसी व जे जॉन्सन या स्पर्धेत होते.
गेले काही दिवस बायडेन यांच्यावर अश्वेत संरक्षण मंत्री नेमावा या साठी दबाब येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ऑस्टिन संकटकाळात योग्य निर्णय घेणारे म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या बद्दल सैन्यात आदरभावना आहे. शिवाय बायडेन उपराष्ट्रपती असताना त्यांनी ऑस्टिन यांच्या सोबत काम केले आहे.