भारतात माफक किमतीत मिळू शकते सीरमची कोरोना लस


पुणे – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोरोना प्रतिबंधक लशीच्या पुरवठयाचा करार करण्यासंदर्भात केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरु असून ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाने मिळून विकसित केलेल्या या लसीचे उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. आतापर्यंत या लसीचे काही कोटी डोस बनून तयार झाले आहेत.

‘कोव्हिशिल्ड’ असे भारतात सीरमने या लसीला नाव दिले आहे. २५० रुपये ‘कोव्हिशिल्ड’च्या प्रत्येक डोसची किंमत असू शकते. सीरमसोबत लसीच्या किंमतीसंदर्भात सुरु असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असलेल्या सरकारमधील सूत्राने सांगितले. यासंदर्भातील वृत्त बिझनेस स्टँडर्डने दिले आहे.

अंतिम टप्प्यात लस पुरवठयाच्या कराराची चर्चा असून यावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होईल, असे सूत्रांनी सांगितले. सीरम इन्स्टिट्यूटकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे आधीपासूनच चार कोटी डोस बनून तयार असल्याचे सांगण्यात आले होते. आणखी १० कोटी डोसच्या उत्पादनाची महिन्याभरात योजना आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. या लसीला ब्रिटनमध्ये मान्यता मिळाल्यानंतर भारतातही कोव्हिशिल्डला मान्यता मिळू शकते.

Loading RSS Feed