अभिनेत्री कृति सेननला कोरोनाची लागण


देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होत असून 96 लाखांच्या पार देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा गेला आहे. बॉलिवूड कलाकार ही यास्थिती पासून बचावले गेले नाही. नुकतेच वरुण धवन, नीतू कपूर आणि मनिष पॉल यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आता अभिनेत्री कृति सेनन हिला देखील कोरोनाची लागण झाल्याचे एका बातमीमधून समोर येत आहे.

चंदीगढ येथे राजकुमार रावसोबत कृति सेनन ही तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तिला याच वेळी कोरोनाची लागण झाली आहे. कृतिच्या निकटवर्तींयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती कृतिने दिलेली नाही. यापूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर कृतिने आगामी चित्रपटाबद्दल सांगितले होते. त्यानंतर कृति हिची सोशल मीडियात कोणतीच नवी पोस्ट दिसून आलेली नाही आहे.