शस्त्रास्त्र विक्रीत अमेरिकन, चीनी कंपन्या आघाडीवर

फोटो साभार सीबीसी

जगभरात २०१९ मध्ये शस्त्रास्त्र विक्रीत अमेरिकन आणि चीनी कंपन्यांनी वर्चस्व राखल्याचे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च संस्थेच्या सोमवारी प्रकाशित झालेल्या ताज्या अहवालात नमूद केले गेले आहे. सर्वाधिक शस्त्रास्त्र विक्री करण्याऱ्या पहिल्या २५ बड्या कंपन्यात प्रथमच मध्यपूर्व देश युएईनेही स्थान मिळविले आहे. स्वीडनच्या या संस्थेने अहवालात जगभरात २०१९ या वर्षात शस्त्रास्त्र विकणाऱ्या कंपन्यात अमेरिकन कंपन्यांचा वाटा ६१ टक्के तर चीनी कंपन्याचा हिस्सा १५.७ टक्के असल्याचे म्हटले आहे.

उर्वरित २५ कंपन्यांच्या शस्त्रास्त्र विक्रीत ८.५ टक्के वाढ नोंदविली गेली असून त्यांनी यातून ३६१ अब्ज डॉलर्स किमतीची शस्त्रे विकली आहेत. त्यात अमेरिकेतील पाच, चीनच्या चार कंपन्या पहिल्या दहा मध्ये आहेत. सातव्या नंबरवर ब्रिटनची बीएई सिस्टीम ही कंपनी आहे. उर्वरित कंपन्यात १२ अमेरिकन कंपन्या आहेत.

चीनी कंपन्यांना पीपुल्स लिबरेशन आर्मी (चीनी सेना) आधुनिकीकरणाचा मोठा फायदा मिळाला आहे. अमेरिकेच्या लॉकहिड मार्टीन, बोईंग, नोर्थेरूप ग्रुपमन, रेथीयोन, जनरल डायनामिक्स तर चीनच्या एवीएशन इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन ऑफ चायना, इलेक्ट्रोनिक टेक्नोलोजी ग्रुप कार्पोरेशन, नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप, साउथ इंडस्ट्रीज ग्रुप यांचा समावेश आहे. भारताला राफेल विमाने देणारा फ्रांसचा दार्सो एवीएशन ग्रुप प्रथमच पहिल्या २५ कंपन्यात समाविष्ट झाला असल्याचे या ताज्या अहवालात नमूद केले गेले आहे.