लाँच पूर्वीच नोकिया ५.४ स्मार्टफोन फिचर लिक

फोटो साभार माय स्मार्ट प्राईज

नोकियाचा ५.४ मिडरेंज स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच चर्चेत आला असून या फोन संदर्भात आत्तापर्यंत अनेक लिक्स आले आहेत. त्यात आणखी एका लिकची भर पडली आहे. माय स्मार्टप्राईज टिप्सटर सुधांशु यांनी या संदर्भात काही लिक्स सार्वजनिक केले आहेत. त्यानुसार एचएमडी ग्लोबलचा हा स्मार्टफोन मिडरेंज कॅटगरी मध्ये ग्राहकांना उपलब्ध होईल.

या फोनसाठी ६.३९ इंची एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले असेल आणि तो निळ्या आणि जांभळ्या रंगात मिळेल. त्याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर, ४ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल स्टोरेज, ते मायक्रोएसडीच्या सहाय्याने २५६ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा मिळेल. ड्युअल सीम, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट शिवाय क्वाड कॅमेरा सेटअप असेल. त्यात रिअरला ४८ एमपीचा प्रायमरी, ५ एमपीचा अल्ट्रावाईड, २ एमपी मॅक्रो, २ एमपी डेफ्थ सेन्सर असतील. सेल्फी साठी १६ एमपी कॅमेरा असेल.

या फोनला ४००० एमएएच बॅटरी, युएसबी टाइप सी चार्जिंग, अँड्राईड १० ओएस, रिअर मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल असे सांगितले जात आहे.