‘हा मुद्दा फक्त शेतकऱ्यांचा आहे, त्यामुळे आंदोलनाला जातीयवादाचा रंग देऊ नका’


पंजाब, हरयाणातील शेतकरी केंद्र सरकारच्या तीन कृषि विधेयकाविरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले असून दिल्लीच्या सीमेवर हे शेतकरी निषेध करत आंदोलन करत असून त्यांना देशातील सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर अन्य राज्यांमध्येदेखील या आंदोलनाचे पडसाद उमटू लागल्याचे दिसून येत असल्यामुळेच अभिनेता दिलजीत दोसांजने जनतेला आवाहन करत या आंदोलनाला जातीयवादाचा रंग देऊ नका, असे म्हटले आहे.


या शेतकरी आंदोलनाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. याच दरम्यान या आंदोलनाला अनेकांकडून जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत असल्यामुळेच दिलजीतने आंदोलनाकडे आंदोलन म्हणूनच पाहा, त्यात जातीयवादाचा मुद्दा आणण्याचा प्रयत्न करु नका, असे आवाहन नागरिकांना केले आहे. आंदोलनाच्या नावाखाली काही लोक हिंदू-शीख असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा मुद्दा फक्त शेतकऱ्यांचा असून यात कोणत्याही धर्माचा विषय किंवा मुद्दा नाही. कधीच कोणताही धर्म वादा करण्यासाठी सांगत नसल्याचे ट्विट दिलजीतने केले आहे.