मुंबईतील ‘या’ परिसराला 9 व 10 डिसेंबरला मिळणार नाही पाणी


मुंबई – सुमारे चार किलो मीटर लांबीची ब्रिटीशकालीन तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम बृह्नमुंबई महानगरपालिकेने हाती घेतले असल्यामुळे येत्या 9 व 10 डिसेंबर रोजी या कामासाठी एस विभागातील काही परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. तर, के पूर्व, एच पूर्व, एल उत्तर आणि जी उत्तर या विभागांमध्ये याच दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्यामुळे या सदर विभागातील नागरिकांना 8 डिसेंबर रोजी पाण्याचा पुरेसा साठा करण्याचे तसेच पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने या भागातील सर्व नागरिकांना करण्यात आहेत.

त्यानुसार ‘एस’ विभागातील डक लाईन, राजाराम वाडी, श्रीराम पाडा, खिंडीपाडा, टेंभीपाडा, सोनापुर, तुलशेतपाडा, प्रताप नगर, जमिल नगर, समर्थ नगर, सुभाष नगर, द्राक्षबाग, उत्कर्ष नगर, राजदीप नगर, लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा नाहूर (पश्चिम) व भांडुप (पश्चिम) परिसर, जयभीम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि लगतचा परिसर, फिल्टर पाडा, आंब्याची भरणी, रावते कंपाऊंड, राम नगर, पासपोली गाव, मोरारजी नगर, गांवदेवी टेकडी, सर्वोदय नगर या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

त्याचबरोबर ‘के पूर्व’ विभागातील चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्र. 1 व 2, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगत सिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक परिसर, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग परिसर, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक परिसर, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, क्रांती नगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत, ओम नगर, क्रांती नगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक परिसर) सहार गाव, सुतार पाखाडी, विजय नगर मरोळ परिसर, सिप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर या परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

तसेच ‘एल’ विभागातील कुर्ला उत्तर परिसर, बरेली मस्जिद, 90 फुटी रस्ता, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरी-मरी, घाटकोपर अंधेरी लिंक मार्ग, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर, साकी विहार मार्ग, मारवा औद्योगिक मार्गा लगतचा परिसर, सत्य नगर पाईपलाईन या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

दरम्यान ‘जी उत्तर’ विभागात धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग, प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मिल मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, 90 फूट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग या परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच ‘एच पूर्व’विभागातील वांद्रे टर्मिनल सप्लाय झोन परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा

संबंधित नागरिकांनी यामुळे आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच काटकसरीने पाण्याचा वापर करुन सदर जलवाहिनी बदलण्याच्या कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.