टीकाकारांना कंगना राणावतने दिले फिल्मी स्टाईलमध्ये उत्तर


नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर वक्तव्य करुन त्यानंतर त्यावर वाद निर्माण करणे हे काही आता कंगना राणावतसाठी नवीन राहिलेले नाही. जेव्हापासून तिने ट्विटरवर एंट्री घेतली, तेव्हापासून तर हे वाद चांगलेच वाढायला लागले आहेत. दिल्लीच्या सीमेवर होत असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन तिने अनेक ट्विट्स केले आहेत.

याचदरम्यान आंदोलनात सामील झालेल्या एका वयोवृद्ध महिलेबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे कंगनाला चांगलेच महागात पडले आहे. त्यावरुन अभिनेता-गायक दिलजीत दोसांजने तिची चांगलीच शाळा घेतली आणि दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरुवात झाली. नंतर ते ट्विट कंगनाला डिलीट करावे लागले होते. आता आपल्यावर टीका करणाऱ्यांना कंगनाने निशाणा साधणारे ट्विट कले आहे.


तिचे समर्थन करणाऱ्यांच्या ट्विटला उत्तर देत कंगनाने लिहिले की, तुम्ही काय म्हणता? या देशातील सध्या मी हॉटेस्ट टार्गेट आहे. माझ्यावर निशाणा साधा आणि मीडियाचे लाडके व्हा. तुम्हाला मूव्ही माफिया द्वारे रोल ऑफर केले जातील. चित्रपटात तुम्हाला काम दिले जाईल. फिल्मफेअर अवॉर्ड तुम्हाला मिळणार आणि शिवसेनेचे तिकीटही मिळणार. मी जर डॉन असती तर तुम्हाला माहीत आहेच. ७२ देशांचे पोलीस माझ्या मागावर असते.