चक्क रस्त्याविरोधात महिलेची छळवणुकीची तक्रार


औरंगाबाद : औरंगाबाद ते फुलंब्री रस्ता मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास व्हावा म्हणून आपली अडवणूक करत कसल्याची शहरातील एका महिलेने तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. एखाद्या व्यक्तीपासून आजवर त्रासमुक्त करण्यासाठी तत्पर पोलीससुद्धा एका प्रयोग शाळा तंत्रज्ञ महिलेने केलेल्या या तक्रारीने गोंधळात पडले आहेत. केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचे काम त्वरित करण्यासाठी निर्देश देऊनही कामात गती आलेली नाही.

तक्रार दाखल करणाऱ्या महिलेचे संध्या घोळवे-मुंडे असे नाव आहे. औरंगाबाद शहरात त्या राहत असून फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करतात. त्या येथे गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत असून औरंगाबाद ते फुलंब्री असा अप-डाउन प्रवास रोज करत असतात. या रस्त्याचे अर्धवट काम झाल्याने प्रवाश्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्याचा मुंडे यांनासुद्धा दररोज सामना करावा लागत असल्यामुळे त्यांनी थेट औरंगाबाद-फुलंब्री या रस्त्या विरोधातच पोलिसात तक्रार केली आहे.

संध्या घोळवे-मुंडे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, रस्त्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. या बाबत संबंधितांवर प्रशासनाने कारवाई केली नाही तर न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचेही यांनी सांगितले आहे. मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास व्हावा या हेतूने हा रस्ता धक्काबुक्की व अडवणूक करीत आहे. हा रस्ता सुधारेल, त्याच्यामध्ये काही बदल होईल, अशी मला आशा होती. पण तसे न होता हा रस्ता दिवसेंदिवस प्राणघातक बनत चालला असल्याचेही त्यांनी म्हटले

Loading RSS Feed