अभिनेता मनीष पॉलला चित्रीकरणादरम्यान कोरोनाची लागण


बॉलिवूड अभिनेता आणि विनोदवीर मनीष पॉल हा कोरोनाबाधित झाला असून त्याला जुग जुग जियो या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असतानाच कोरोनाची लागण झाली. मनीषला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. त्यानंतर केलेल्या चाचणीमध्ये त्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याची माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तात नमूद केली आहे.

मनीष गेल्या काही दिवसांपासून ‘जुग जुग जियो’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. याच काळात त्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर मनीष मुंबईत परतला आहे. दरम्यान, मनीष पॉलपूर्वी अभिनेता वरुण धवनलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. लवकरच ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात मनीष आणि वरुण झळकणार आहेत. राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून अभिनेत्री नीतू कपूर बऱ्याच वर्षानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार आहेत.