हे ड्रोन अंतराळात उपग्रह लाँच करू शकणार

 

फोटो साभार पत्रिका

अमेरिकेतील एईवम (Aevum) कंपनीने रॅवन एक्स  (RAVN X ) नावाने डिझाईन केलेले ड्रोन जगातील सर्वात मोठे ड्रोन आहेच पण ते छोटे उपग्रह अंतराळात स्थापन करण्यासाठी सुद्धा वापरता येणार आहे. जगातील बहुतेक देशांनी आपापले विविध कार्यासाठी बनविलेले उपग्रह अंतराळात स्थापित केले आहेत. उपग्रह अंतराळात स्थापन करणे ही एक जटील प्रक्रिया आहे. त्यासाठी अतिशय अचूक मोहीम आखावी लागते. एईवम (Aevum) कंपनीने छोटे उपग्रह लाँच करण्यासाठी स्वयंचलित हवाई प्रक्षेपण प्रणालीसाठी हे ड्रोन खास डिझाईन केले आहेत.

सध्या रॉकेट लॅब, स्पेस एक्स, वर्जीन ऑर्बीट अश्या अनेक स्टार्टअप भविष्यात अंतराळात सहज, सुलभ आणि सोपे लाँचिंग तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी काम करत आहेत. एईवम (Aevum) ने बनविलेले ड्रोन १.६ किमी लांबीच्या रनवेवर सहज लँड होऊ शकते. हे ड्रोन ८० फुट लांब, १८ फुट उंच आणि ६० फुट रुंद आहे. त्याच्या पंखांचा विस्तार १८ फुट आहे. ते ठेवण्यासाठी ८ हजार चौरस फुटाचा हँगर पुरतो. हे ड्रोन विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या जेट इंधनावर चालते. या ड्रोन वर कोणत्याही हवामानाचा परिणाम होत नाही त्यामुळे कोणत्याही हवामानात ते काम करू शकते.

सध्या या ड्रोनचा ७० टक्के भाग पुन्हा उपयोगात आणता येतो. एईवम (Aevum) हे ड्रोन १०० टक्के रीयुजेबल बनविण्यासाठी सध्या काम करत आहे. वर्जीन कंपनीचे विमान सुद्धा जगातील मोठे विमान असून ते अंतराळात पेलोड लाँच करण्यासाठीच विकसित केले गेले आहे. पण या विमानाला पायलटची गरज आहे. एईवम (Aevum)च्या ड्रोन साठी पायलटची आवश्यकता नाही. ते १८० मिनिट प्रती लाँच वेगाने पेलोड फायर करू शकते.

कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी जे स्कायलस यांनी दिलेल्या माहितीनुसार या ड्रोनचे पाहिले ग्राहक अमेरिकन हवाई दल असून पृथ्वीच्या कक्षेत छोटे उपग्रह समूह स्थापन करण्याची हवाई दलाची योजना आहे.