ओबामा यांच्या ४१ वर्षापूर्वीच्या जर्सीला विक्रमी किंमत

फोटो साभार फॉक्स न्यूज

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ४१ वर्षापूर्वी बास्केट बॉल स्पर्धेत वापरलेल्या जर्सीचा लिलाव नुकताच झाला असून तिला १९२००० डॉलर्स म्हणजे १ कोटी ४० लाखाची बोली मिळाली. सर्वाधिक किंमत मिळण्याचे रेकॉर्ड या जर्सीने नोंदविले. ओबामा सध्या त्यांच्या ‘ए प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकामुळे खुपच चर्चेत आले असून त्यात त्यांनी अनेक भारतीय राजकीय नेत्यांबद्दल सुद्धा मत प्रदर्शित केले आहे.

हायस्कूल मध्ये शिकत असताना ओबामा यांनी १९७९ मध्ये हवाई येथील शाळा बास्केट बॉल स्पर्धेत ही जर्सी वापरली होती. पांढऱ्या रंगाच्या या जर्सीचा नंबर आहे २३. याचवेळी माजी राष्ट्रपतीच्या जर्सी सोबत निवृत्त एनबीए चे दिग्गज मायकल जॉर्डन व माजी एनएफएल क्वार्टर बॅक कॉलीन कॅपरमिक यांच्याही जर्सीचा लिलाव केला गेला. या तिन्ही जर्सिनी विक्रीचे विश्व रेकॉर्ड नोंदविले. सही केलेल्या एनबीए फायनल जर्सी ला ३८००० डॉलर्सची बोली लागली.

१९५८ मधल्या फिफा वर्ल्ड कप मधील एका टीमच्या कप्तानाचा आर्मबँड १०,२४० डॉलर्सला विकला गेला.