महाराणी एलिझाबेथ यांच्यापेक्षा श्रीमंत आहे नारायण मूर्तींची मुलगी


नवी दिल्ली – इंफोसिसच्या नारायण मूर्ती यांची मुलगी आणि ब्रिटनचे वित्त मंत्री ऋषि सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती ह्यांची संपत्ती ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेझ यांच्यापेक्षा अधिक असल्याचे वृत्त समोर आलं आहे. अक्षता मूर्ती यांच्याकडे इंफोसिसचे 0.91 % शेअर आहेत. त्याची किंमत अंदाजे 4300 कोटी सांगितली जात आहे. यासंदर्भात गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षता मूर्ती यांची संपत्ती GBN 480 मिलियन आहे. तर राणी एलिझाबेझ यांची खाजगी संपत्ती GBN 350 मिलियन आहे. सुमारे GBN 100 मिलियन पेक्षा अधिक फरक अक्षता आणि राणी एलिझाबेझ यांच्या संपत्तिमध्ये आहे.

ब्रिटनमध्ये सध्या अर्थमंत्री ऋषि सुनक यांनी आपल्या संपत्तीचे पूर्ण विवरण सादर न केल्यामुळे त्यांचे नाव चर्चेमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केवळ अक्षता या लंडन मधील Catamaran Ventures च्या मालकीण असल्याचे सुनक यांनी जाहीर केलेल्या आर्थिक संपत्तीच्या विवरणामध्ये सांगण्यात आले आहे. ब्रिटीश मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अक्षता इंफोसिस व्यतिरिक्त अन्य काही कंपन्यांमध्ये संचालक पदी आहेत. त्याचबरोबर ऋषि सुनक यांची संपत्ती देखील अंदाजे 2 हजार कोटींच्या आसपास आहे. ब्रिटन मधील सर्वात श्रीमंत खासदारांपैकी ते एक आहेत.

2009 साली अक्षता मूर्ती आणि ऋषी सुनक यांचे लग्न झाले असून स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकताना दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि पुढे लग्नात झाले. 60च्या दशकात ऋषि सुनक यांची आई पूर्व आफ्रिकेमधून ब्रिटन मध्ये स्थलांतरित झाली होती. ऋषि आणि अक्षता यांना 2 मुले आहेत.