‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कार सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांना जाहीर


पुणे – ‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कार पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार सिंगापूरमधील आघाडीचे वृत्तपत्र ‘द स्ट्रेट्स टाइम्स’कडून दिला जातो. या पुरस्कारासाठी आशियातील सहा व्यक्तींची निवड झाली असून पुनावाला यांच्या नावाचा यात समावेश आहे. कोरोना महामारीविरोधातील लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार पुनावाला यांना देण्यात येणार आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी अस्ट्राझेनेका यांच्या सहकार्याने जगातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने कोरोनावर ‘कोविशिल्ड’ नावाने प्रतिबंधक लस विकसित केली आहे. सध्या या लसीची भारतात तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.