रणजितसिंह डिसलेंची विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी शिफारस करणार – प्रवीण दरेकर


सोलापूर – ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरचे रणजितसिंह डिसले यांना जाहीर करण्यात आल्यानंतर सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बार्शीत येऊन आज डिसले यांचा सन्मान केला.

त्याचबरोबर प्रवीण दरेकर यांनी यावेळी रणजित डिसले यांची विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागेसाठी शिफारस करू, असे सांगितले आहे. प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले, नुकत्याच विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक पार पडल्या. पण या यामध्ये शिक्षक नसलेला व्यक्ती शिक्षक आमदार होतो, हे देशाचे दुर्दैव आहे. रणजित डिसले यांची विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागेसाठी शिफारस करणार असल्याचे दरेकर म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करुन लवकरच शिफारशीचे पत्र देण्याचे आश्वासन देखील दरेकर यांनी दिले आहे.