बायोबबल मध्येही द.आफ्रिकेच्या खेळाडूला करोना संसर्ग

फोटो साभार झी न्यूज

द.आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरु होणाऱ्या वन डे सिरीज मधला ४ डिसेंबरचा सामना स्थगित केला गेला असून तो ६ डिसेंबर रोजी खेळविला जाणार आहे. गुरुवारी खेळाडूंच्या करोना टेस्टची शेवटची चाचणी केली तेव्हा द. आफ्रिकेच्या एका खेळाडूला करोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्याने द. आफ्रिका क्रिकेट बोर्ड आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड यांनी परस्पर सहमतीने सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असे समजते.

द. आफ्रिका आणि इंग्लंड याच्यात वनडे सिरीज सुरु होण्यापूर्वी टी २० ची तीन सामने मालिका झाली असून त्यात इंग्लंडने द. आफ्रिकेचा ३-० ने धुव्वा उडविला आहे. त्यानंतर वन डे सिरीज मध्ये तीन सामने होत आहेत. विशेष म्हणजे सर्व खेळाडू आणि खेळ प्रतिनिधी बायोबबल मध्ये असताना या खेळाडूला करोना लागण झाली कशी हा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थगित केलेला सामना ६ डिसेंबर रोजी खेळविला जाणार असून पुढचे दोन सामने ८ आणि ९ डिसेंबर ला होतील असे जाहीर केले गेले आहे.