पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर प्रहार


मुंबई: महाविकास आघाडीकडून राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे दुखावले गेलेले भाजप नेते आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच या निवडणुकीत फायदा झाला असून शिवसेनेच्या हाती काहीच लागलेले नाही, अशी वक्तव्ये भाजप नेत्यांकडून आता केली जात आहेत. यामध्ये आता शिवसेनेचे कट्टर विरोधक आणि भाजप आमदार नितेश राणे यांनीही उडी घेतली आहे.


यासंदर्भात नितेश राणे यांनी ट्विट करत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेला भाजपचा पराभव मान्य केला. ठीक आहे आम्ही कमी पडलो. पण मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला भोपळाही फोडता आली नाही. मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या मृत्यूचा सापळा रचला आहे. बाकी मैदानात परत भेटूच, असे म्हटल्यामुळे त्यामुळे आता नितेश राणे यांच्या या टीकेला शिवसेनेच्या गोटातून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.