या आजीबाईना मोदींच्या नावावर करायची आहे स्वतःची जमीन

 

फोटो साभार नवभारत टाईम्स

उत्तरप्रदेशातील मैनपुरी येथील ८० वर्षीय बिट्टनदेवी या आजींना त्यांच्या नावावर असलेली साडे बारा बिघे जमीन पंतप्रधान मोदी यांच्या नावावर करून द्यायची आहे. तहसील कार्यालात जाऊन त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आणि दोन दिवसांनी त्या परत कार्यालयात गेल्या तेव्हा त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. मोदींच्या नावावर जमीन करून देण्याचा निर्णय त्यांनी काही कारणांनी घेतला आहे.

बिट्टनदेवीना तीन मुले, सुना आहेत. पतीचे निधन झाले आहे. त्या म्हणतात मुले, सुना माझी देखभाल करत नाहीत. माझी उपजीविका मोदींच्या मदतीवर सुरु आहे. मोदी सरकारने सुरु केलेल्या अनेक योजनांमुळे मला महिन्याची पेन्शन, रेशन, किसान सन्मान निधी वेळेवर मिळत आहे. मोदींनी माझ्या साऱ्या अडचणी दूर केल्या आहेत. माझ्यासारख्या अन्य लोकांना सरकारी योजनाचा लाभ मिळावा म्हणून मी माझी जमीन मोदींच्या नावावर करून देणार आहे. त्यामुळे त्यांच्या मदत कार्याला थोडा हातभार लागेल.

बिट्टन देवीच्या वकिलाने त्यांना या संदर्भात खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्या ऐकायला तयार नाही. शेवटी घरातील लोकांची बोलून मग निर्णय घ्या असे सांगून बिट्टन देवींची घरी रवानगी केली.