एक ऑर्डर, डिलीव्हरीसाठी आले ४२ डिलीव्हरी बॉय

फोटो साभार क्रॅॅब फूड

घरबसल्या आवडीचे खाद्यपदार्थ मागविणे हे आता सर्वांच्या अंगवळणी पडले आहे. त्यासाठी शेकडो प्रकाराची फूड अॅप उपलब्ध आहेत आणि त्यावरून हव्या त्या हॉटेल मधून आपल्या आवडत्या डिश घरपोच दिल्या जातात. पण काहीवेळा यामुळे चांगलाच गोंधळ होऊ शकतो, कसा ते पहा,

फिलीपिन्स मधील एका शाळकरी मुलीने ऑनलाईनवरून फूड ऑर्डर केले आणि आजीसह ती डिलीव्हरीची प्रतीक्षा करत होती तेव्हा तिच्या घराच्या छोट्याश्या गल्लीत एकापाठोपाठ एक अशी डिलीव्हरी बॉईजची एकच गर्दी झाली. एक दोन नव्हे तर तब्बल ४२ डिलीव्हरी बॉइज या गल्लीत येऊन पोहोचले आणि तिथे एकच गर्दी झाली.

हा काय प्रकार चाललाय हेच त्या मुलीला कळेना आणि गल्लीत इतके डिलीव्हरी बॉइज कसे हे शेजारी पाजारी लोकांना कळेना. शेवटी खुलासा झाला तो असा की या मुलीने ज्या फूड अॅप वरून फुड मागविले होते त्या अॅप मध्ये काही तांत्रिक गोंधळ झाल्याने एका ऐवजी ४२ ऑर्डर बुक झाल्या आणि त्यामुळे ४२ डिलीव्हरी बॉइज ती ऑर्डर डीलीव्हर करण्यासाठी आले.