उत्तर प्रदेशच्या मंत्र्याची सामनाच्या अग्रलेखावर टीका; आदित्यनाथ मुंबईत आल्याने ठाकरेंची उडाली झोप


लखनऊ : उत्तर प्रदेशचे ‘वास्तव’ आज सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर मनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे साधू महाराज असून मुंबई मायानगरीत या साधू महाराजांचे आगमन झाले आणि ‘ऑबेरॉय ट्रायडण्ट’च्या समुद्रकिनाऱ्यावरील मठात ते निवासाला आहेत. मुंबईच्या मायानगरीप्रमाणे अतिसुंदर अशी मायानगरी उत्तर प्रदेशात निर्माण करावी. मायानगरी निर्माण व्हावी यासाठी यमुना एक्प्रेसजवळ त्यांच्या सरकारने एक हजार एकर जागा दिली आहे. आता पुढील कार्यवाहीसाठी साधू महाराज मुंबईत आल्याचे म्हटले आहे. यावर उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी टीका केली आहे.

सामनाच्या संपादकीयवर उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री एस एन सिंह यांनी टीका करताना निषेधही केला आहे. मुंबईत योगी आदित्यनाथ आल्यामुळे उद्धव ठाकरेंची झोप उडाल्याचे दिसत असल्यामुळे सामनाच्या संपादकीयमधून त्यांनी चुकीची भाषा वापरली आहे. आम्ही याचा निषेध करतो. त्यांच्या पक्षाची कदाचित ही संस्कृती असेल. बॉलिवूडच्या लोकांचे आम्ही खुल्या दिलाने स्वागत करतो, असे सिंह म्हणाले आहेत. दुसऱ्यांकडे शिवसेना बोट दाखवू शकत नाही. त्यांनी त्याआधी बॉलिवूडसोबत असलेल्या परंपरेचा अभ्यास करावा. जर काही त्यांना ठेवायचे असेल तर ते त्यांनी जरूर ठेवावे. फिल्मसिटी कोणालाही काढून घ्यायची नाहीत. कारण हे सारे स्पर्धेतून होत असल्याचेही सिंह म्हणाले.