ट्रम्प प्रशासनाचे ‘एच १ बी’ व्हिसावरील निर्बंध न्यायालयाने फेटाळले


वॊशिंग्टन: ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन कंपन्यांना स्थलांतरित कर्मचारी घेण्यास अडथळा ठरणारे एच १ बी व्हिसावरील निर्बंध न्यायालयाने फेटाळले आहेत. या निर्णयाने विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो भारतीय कर्मचारी आणि अमेरिकन कंपन्या यांना दिलासा मिळाला आहे.

अमेरिकन कंपन्यांना विदेशातील कुशल कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी उपयुक्त असलेला एच १ बी व्हिसा दिला जातो. दरवर्षी सुमारे ८५ हजार एच १ बी व्हिसा दिले जातात. भारत आणि चीनमधील तब्बल ६ लाख जण या व्हिसावर अमेरिकेत काम करीत आहेत. स्थानिक युवकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी या व्हिसाच्या संख्येवर ट्रम्प प्रशासनाने निर्बंध घातले होते. पात्रतेच्या कठोर अटीही न्यायालयाने रद्द केल्या आहात.

अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने या निर्बंधांच्या विरोधात उत्तर कॅलिफोर्निया जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती. अमेरिकेच्या प्रगतीत स्थलांतरितांचे बुद्धी, कौशल्य आणि कार्यक्षमतेचा वाट महत्वाचा आहे, असे न्यायालयाने नमूद केले. सध्याच्या कोरोना महासाथीच्या काळात अनेकांचे उदोग व्यवसाय अडचणीत आल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगांवर अनावश्यक निर्बंध घालणे अयोग्य ठरेल,असेही न्यायालयाने म्हटले आहे.