प्रेमासाठी कायपण! प्रियकराच्या नववधुचे प्रेयसीने केस कापले, फेविक्विकने चिकटवले डोळे


नालंदा – प्रियकर किंवा प्रेयसी प्रेमात फसवणूक झाल्यानंतर जास्तीत जास्त शाब्दिक राग व्यक्त करतात. तर आपल्या पद्धतीने काही वेळा जोडीदाराला धडा शिकवला जातो. पण बिहारमधील नालंदा येथील एका मुलीने आपल्या प्रियकरसोबत केले, ते पाहून सर्वचजण अवाक झाले. ही घटना संपूर्ण नालंदामध्ये चर्चेचा विषय बनली असून यासंदर्भातील वृत्त आज तकने दिले आहे.

आपली फसवणूक करुन प्रियकराने दुसऱ्या मुलीसोबत संसार थाटला असल्याचे समजल्यानंतर फक्त शब्दांमधुन प्रेयसीने आपला राग व्यक्त केला नाही तर तिने थेट प्रियकराचे घर गाठून नववधूला मारहाण केली. त्याचबरोबर तिचे केस कापले व तिचे डोळे फेविक्विकने चिकटवले. मुलीने संतापाच्या भरात केलेले हे कृत्य पाहून सर्वचजण अवाक झाले आहेत. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चौकशी सुरु केली. आरोपी मुलगी आणि नवरदेवाचे प्रेम प्रकरण सुरु होते. पण एक डिसेंबर रोजी त्याने शेखपुरा जिल्ह्यातील दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले.

प्रियकराने आपल्याला धोका देत दुसऱ्या व्यक्तीसोबतच्या संसार थाटल्याचे समजल्यानंतर संतापलेली प्रेयसी जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली आणि झोपेत असलेल्या नववधूचे तिने केस कापले व तिचे डोळे फेविक्विकने चिकटवले. त्यानंतर नवरीला जबर मारहाण केली. हा सर्व गोंधळ सुरु असताना नातेवाईक तिथे पोहोचले व त्यांनी आरोपी मुलीला पकडले. आरोपी युवतीला पोलिसांनी अटक केली असून नववधूला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. ही घटना भागनबिगहा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मोरा तालाब गावात घडली आहे.