जगात पहिल्यांदाच lab grown meat ला मिळाली मान्यता


सिंगापूर : नुकतीच खाद्यपदार्थांशी निगडीत असलेल्या US startup प्रयोगशाळेत तयार झालेल्या चिकनच्या विक्रीसाठी (Lab grown chicken) सिंगापूरने मान्यता दिली असून जगात पहिल्यांदाच अशा प्रकारे lab grown meat ला मान्यता मिळाल्यामुळे ग्राहकांना स्वच्छ मांस उपलब्ध होणार असल्याचा दावा संबंधित कंपनीने केला आहे. त्याचबरोबर जेव्हा हे मांस सिंगापूरमधील रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध होईल, तेव्हा अन्य मांसाच्या किंमती एवढीच त्याची किंमत असेल, असे कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जोश टेट्रिक यांनी सांगितले.

सध्या आरोग्य, पशु कल्याण आणि पर्यावरणीय स्थिती यामुळे उपलब्ध असलेल्या चिकनला पर्याय देण्याची मागणी येत आहे. शेल्फ आणि रेस्टॉरंटमधील वैशिष्ट्यपूर्ण मेनू बियॉन्ड मीट, इम्पॉसिबल फूड्स आणि क्वॉर्न यासारख्या वनस्पती-आधारित लोकप्रिय पर्यायांमुळे सुपरमार्केट वाढत आहेत. पण प्रयोगशाळेत स्वच्छ प्राण्यांच्या स्नायूंच्या पेशींपासून मांस विकसित करण्याची प्रक्रिया जादा उत्पादन खर्चामुळे प्राथमिक अवस्थेत आहे.

57 लाखांच्या दरम्यान सिंगापूर शहराची लोकसंख्या असून शहराच्या एकूण खाद्यान्न गरजेच्या तुलनेत केवळ 10 टक्के उत्पादन येथे होते. परंतु, आगामी दशकात उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेती आणि नवी माध्यमांच्या वापरातून अन्न उत्पादन वाढीसाठी योजना आखल्या जात आहेत. जोश टेट्रिक म्हणाले, की याबाबत सॅनफ्रॅन्सिस्को येथील फर्म अमेरिकेतील नियमकांशी बोलणी करीत असून अमेरिकेपेक्षा सिंगापूर हे आम्हाला अधिक चांगले वाटते.

सिंगापूर फूड एजन्सीने याबाबत मान्यता देण्यापूर्वी प्रक्रिया, उत्पादन नियंत्रण आणि सुरक्षा चाचणीशी संबंधित डेटाचा आढावा घेतल्याचे सांगितले. सिंगापूरमध्ये या मांसाचे उत्पादन होईल, येथेच अमेरिकेत व्यापारी तत्वावर विक्री होणाऱ्या पर्यायी मूग आधारित अंड्यांचे उत्पादन घेण्याचे नियोजन आहे, असे इट जस्टने सांगितले.

हाँगकाँग येथील प्रख्यात ली का शिंग आणि सिंगापूरमधील गुंतवणूकदार टेमसेक यांनी 2011 मध्ये स्थापन झालेल्या इटजस्टचे कौतुक केले आहे. स्थापनेपासून कंपनीने 300 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक उत्पन्न मिळवले असून त्याचे अंदाजे मूल्य 1.2 अब्ज डॉलर आहे. 2021 संपण्यापूर्वी कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्नाच्या पातळीवर नफा मिळवण्याचे उद्दिष्ट आहे, असे टेट्रिक यांनी नमूद केले.

पर्यायी मांसाच्या बाजारपेठेत जागतिक पातळीवरील दोन डझनांहून अधिक कंपन्या प्रवेश करण्याच्या विचारात असून प्रयोगशाळांमध्ये या कंपन्या मासे, कोंबड्या विकसित करण्यात बाबत चाचण्या घेत आहेत. यात बार्कलेजचे 2029 पर्यंत अंदाजपत्रक सुमारे 1 अब्ज डालर्सचे असेल. यातील काही स्पर्धक कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधत गुंतवणूकीसाठी त्यांना आकर्षित केले आहे. जपानच्या सॉफ्टबँक ग्रुप आणि टेमेसेक यांच्या नेतृत्वात अमेरिकेतील मेम्फिस मेटसने करार केला असून निधी देखील उभारला आहे. या कंपनीला बिल गेटस आणि रिचर्ड ब्रॅन्सन यांचा सबळ पाठिंबा आहे. प्रयोगशाळेत सिंगापूरच्या शिओक मीटसने विकसित केलेली कोळंबी विक्री करणारी पहिली कंपनी बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. फिलीपिन्सच्या मोनडे निसीन कार्पचे हेनरी सोसॅंटो यांनी याला पाठिंबा दर्शवला आहे.