जाणून घ्या नवीन वर्षातील महत्त्वाचे सण कोणत्या दिवशी, किती सुट्ट्या, किती लाँग विकेन्ड?


मुंबई : यंदाचे अर्ध्याहून अधिक वर्ष कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घरात बसूनच गेले आहे. त्याचबरोबर ३१ डिसेंबर साजरे करण्यासाठीही सरकार कदाचित गाइडलाइन जारी करु शकते. आपण लवकरच २०२० वर्षाला निरोप देऊ आणि २०२१ वर्षाचे स्वागत करु. अवघे काही दिवस नववर्ष सुरु होण्यासाठी बाकी आहेत. अनेकांनी यानिमित्ताने नवीन वर्षाचे कँलेडर देखील चाळायला सुरुवात केली आहे. त्यात कोणत्या दिवशी कोणती सुट्टी आहे, त्याचबरोबर शुक्रवारी कोणती सुट्टी आली आहे, ज्यामुळे लाँग विकेन्डचे प्लॅन करता येतील, याचेही जोरदार नियोजन करण्यात अनेकांनी सुरुवात केली असेल.

शुक्रवारी येत्या वर्षाची सुरुवात होणार असून त्यानंतर वर्षातील पहिली शासकीय सुट्टी २६ जानेवारीला मिळणार आहे. तर १९ फेब्रुवारी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पहिला लाँग विकेन्ड मिळणार आहे. नुकतीच वर्ष २०२१ मधील सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादी महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. येत्या वर्षात कोणते सण कोणत्या तारखेला आले आहेत. ज्यामुळे तुम्हाला कधी लाँग विकेन्डची संधी मिळू शकते. त्यानुसार तुम्ही सुट्टीचा प्लॅन करु शकता.
अशा पुढील वर्षातील सुट्टया