कृषी कायद्यांच्या निषेधार्थ बादल यांनी परत केला ‘पद्मविभूषण’


नवी दिल्ली: पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या अकाली दलाचे नेते प्रकाशसिंह बदल यांनी नव्या कृषिकायद्यांच्या निषेधार्थ ‘पद्मविभूषण’ पुरस्कार परत केला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी यापेक्षा अधिक काही करू शकत नसल्याबद्दल आपल्याला वाईट वाटते, असेही बादल म्हणाले. आपण शेतकऱ्याचे देणे लागतो. आज मी जो काही आहे तो शेतकऱ्यांमुळे आहे. शेतकऱ्यांचा अवमान केला जात असेल तर ‘पद्मविभूषण’सारखे सन्मान काही कामाचे नाहीत. शेतकऱ्यांचा विश्वासघात होता असल्याबद्दल आपल्याला अपार वेदना होत आहेत, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन जातीयवादी आणि फुटीरतावादी आहे. देशाच्या धर्मनिरपेक्षतेलाही ते घटक आहे, अशी टीका त्यांनी केली.